महायुदधोत्तर राजकीय घडामोडी

पार्श्वभूमी

views

3:28
आजचे युग हे आधुनिक युग म्हणून ओळखले जाते. आज आपण ज्या जगात राहात आहोत, ते अनेक घटना, घडामोडींमधून निर्माण झाले आहे. म्हणूनच आजच्या जगाचा अभ्यास करताना आपल्याला थोडा इतिहासाचा अभ्यास करावा लागेल. 19 व्या शतकात दोन महायुद्धे झाली. या दोन महायुद्धांमुळे संपूर्ण जग हादरून गेले. त्यांच्यामुळे जग बदलले. जगात नवीन प्रवाह आले, विचार आले.पहिले महायुद्ध भाग १:- या महायुद्धास तोंड लागण्यास कारणीभूत ठरलेली गोष्ट म्हणजे २८ जून इ.स.१९१४ रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियात हत्या झाली. मात्र हे तात्कालिक कारण होते. या खुनाच्या कारस्थानासाठी सर्बियास जबाबदार ठरविण्यात आले. ऑस्ट्रिया - हंगेरीने सर्बियावर आक्रमण केले. तेव्हा रशियन साम्राज्य सर्बियाच्या मदतीस धावून आले. प्रशियाने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला आणि बेल्जियम व फ्रान्सवर हल्ला केला. यामुळे ब्रिटिश साम्राज्याने प्रशियाविरुद्ध युद्ध पुकारले. २८ जुलै १९१४ ला युद्ध सुरू झाले ते ११ नोव्हेंबर १९१८ पर्यत सुरू राहिले. या युद्धात फ्रान्स, ब्रिटन, रशिया, इटली, व अमेरिका यांसारखी मित्र राष्ट्रे तर रोमनिया, सर्बिया, बेल्जियम, ग्रीस, पोर्तुगाल, जर्मन, ऑस्ट्रेया- हंगेरी, ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया यासारख्या युरोप खंडातील मध्यगत राष्ट्रांचा समावेश होता. पहिल्या महायुद्धाचे खरे कारण युरोपातील प्रबळ राष्ट्रांच्या साम्राज्यवादी धोरणात होते. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल या देशांनी आशिया व आफ्रिका खंडात आपल्या वसाहती निर्माण करून साम्राज्यांचा विस्तार केला होता. या स्पर्धेमध्ये जर्मनी हा देश काहीशा उशिराने उतरला. आणि त्यातून मग स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. ऑस्ट्रियाच्या राजपुत्राच्या हत्येने ठिणगी पडली आणि तिचे रुपांतर पहिल्या महायुद्धाच्या वणव्यात झाले.