महायुदधोत्तर राजकीय घडामोडी

शीतयुदध

views

4:30
दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच ते एकमेकांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली. १९४५ ते १९९१ या कालावधीत ४० – ४५ वर्षे ही स्पर्धा म्हणजेच शीतयुदध चालू राहिले. अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही; परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधामध्ये होता. प्रत्यक्ष युदध नाही पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीला शीतयुदध (cold war) असे म्हणतात. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जगात प्रथमच अणुबॉम्बचा वापर केला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व रशिया वगळता आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पाडू शकतील अशी एकही सत्ता उरली नाही. या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत युनियननेही अण्वस्त्रांची निर्मिती करून आणि आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. अण्वस्त्रे म्हणजे अणुऊर्जेचा वापर करून बनविलेली शस्त्रे होय. जसे अणुबॉम्ब : अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्तास्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचारप्रणाली व तत्वप्रणाली मधील भेद, राजकीय अविश्वास, एकमेकांविरुद्धचे डावपेच, परस्परांना शह-काटशह देण्याची वृत्ती, प्रसार माध्यमांचा विषारी प्रचार, हेरगिरी या सर्व बाबींमुळेच शीतयुद्ध सुरू झाले होते.