महायुदधोत्तर राजकीय घडामोडी Go Back शीतयुद्धाची अखेर views 3:19 १९४५ पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध १९९१ ला संपुष्टात आले. शीत युद्धाचा शेवट होणे, ही एक मागील म्हणजे २० व्या शतकाच्या शेवटी झालेली अत्यंत महत्त्वाची घटना होती. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत होत्या. 1. सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. म्हणजे इतर राष्ट्रांना त्यांच्या देशात व्यापार, देवाण-घेवाण करण्यासाठी बाजारपेठा खुल्या केल्या. राज्याचे अर्थव्यवस्थेचे वरील नियंत्रण दूर केले. 2. सोव्हिएत युनियनचे त्यावेळेचे अध्यक्ष मिखाईल गोबाचेव्ह यांनी ‘पेरेस्रोईका’ म्हणजे पुनर्रचना व ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली. या धोरणांमुळे माध्यमांवरील शासनाचे नियंत्रण कमी झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. 3. पूर्व युरोपीय सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली असलेल्या देशांनी साम्यवादी सत्ता संपुष्टात आणल्या. त्यांनी लोकशाही व भांडवलशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. 4. सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. उदा. रशिया, युक्रेन, उझबेकिस्तान, कझाक, जॉर्जिया, तुर्कमेन यांसारखे १५ देश स्वतंत्र झाले. यातील रशिया हा सोव्हिएत युनियनमधील सर्वात मोठा देश होता. उदा. इ.स.१९८९ मध्ये बर्लिन येथील पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी करणारी बर्लिनची भिंत पाडण्यात येऊन पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण करण्यात आले. वॉर्सा करार संपुष्टात आला. गोर्बाचेव्ह या रशियन राष्ट्राध्यक्षांनी पुढाकार घेऊन शीतयुदधाचा त्याग केला. यामुळे अमेरिका व रशिया या महासत्तांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण झाले. रशियन राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रेगन यांनी प्रत्येक राष्ट्राने लष्करी धोरणात कपात करावी असे सुचविले. तसेच शीतयुद्ध समाप्तीचा संदेश जगाला दिला. अशा तऱ्हेने शीतयुद्धाचा शेवट झाला. प्रस्तावना पार्श्वभूमी पहिले महायुद्ध भाग १ दुसरे महायुदध शीतयुदध जगाचे द्विध्रुवीकरण शस्त्रास्त्र स्पर्धा अलिप्ततावादी चळवळी शीतयुद्धाची अखेर शीतयुद्धानंतरचे जग