भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल Go Back राष्ट्रीय हितसंबंध views 4:08 राष्ट्राचे संरक्षण आणि राष्ट्राचा आर्थिक विकास हे राष्ट्रीय हितसंबंधाचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि या दोन मुद्द्यांची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. म्हणून राष्ट्रीय हितसंबंध ही उददिष्टे मानली जातात. तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन ठरते. म्हणजे राष्ट्राचे संरक्षण व आर्थिक विकास करणे ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणाचा आधार घेतला जातो. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्रांच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात. त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्येही बदल होतात. त्या बदलांचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते. म्हणजे एखादे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पुढील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एखादा देश आपल्या परराष्ट्र धोरणात बदल करून नवीन उद्दिष्टांनुसार आपले परराष्ट्र धोरण आखतो. म्हणूनच परराष्ट्र धोरण प्रवाही असते. म्हणजेच काळानुसार व परिस्थितीनुसार बदलणारे असते. भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेले आहे. ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात काही तरतुदी केल्या पाहिजेत. 1. परराष्ट्र धोरण हे शांततामय सहजीवनाच्या तत्वावर आधारलेले असावे. 2. ते वसाहतींच्या मुक्तीसंग्रामास पाठिंबा देणारे असावे. प्रस्तावना राष्ट्रीय हितसंबंध परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक अर्थव्यवस्था राजकीय नेतृत्व भारताचे परराष्ट्र धोरण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा पहिला टप्पा १९४७ ते १९९० दुसरा टप्पा भाग १ : १९९१ ते आजपर्यंत दुसरा टप्पा भाग २ : १९९१ ते आजपर्यंत