स्वराज्याचे तोरण बांधले. Go Back स्वराज्याची नौबत झडली views 01:31 तोरणा मिळविण्याच्या निश्चयाने शिवराय निवडक मावळ्यांच्या तुकडया घेऊन कानद खोऱ्यात उतरले. सर्व मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपाझप तोरणा चढू लागले. एवढा अवघड गड पण त्यांनी अतिशय वेगाने तो सर केला. गडावर पोहोचल्यानंतर मावळ्यांनी पटकन गडावरील महत्त्वाच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठयांचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू व निष्ठावान मावळा. त्याने जराही वेळ न लावता चौकीवर पहारे बसवले. आणि अशा तऱ्हेने स्वराज्यातील पहिला किल्ला तोरणा हा मराठयांनी ताब्यात घेतला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली. विजयाचे बार उडविण्यात आले. नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. त्याकाळी प्रत्येक आनंदाच्या क्षणी शिंग व नगारा वाजविला जात असे. अशाच प्रकारे शिंग फुंकून व नगारा वाजवून शिवराय व त्यांच्या सहकार्यांनी आपला आनंद साजरा केला होता. पुढे शिवरायांनी तोरणा हे नाव बदलून त्या गडाला ‘प्रचंडगड’ असे नाव दिले. प्रस्तावना स्वराज्याची नौबत झडली भवानी मातेचा आशीर्वाद स्वराज्याची पहिली राजधानी शिवरायांचे चातुर्य