मोलाचे अन्न

प्रस्तावना

views

5:04
आज आपण जो पाठ शिकणार आहोत, त्याचे नाव आहे “मोलाचे अन्न”. खरंच, मुलांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण जे अन्न खातो, ते किती मौल्यवान असते! आपल्या ताटातील भाकरी, चपाती, भाजी आपल्या ताटात पोहोचेपर्यंत त्यासाठी किती जणांनी कष्ट घेतले असतात आणि त्यासाठी किती खर्च झालेला असतो. हे कष्ट व हा खर्च लक्षात घेतलात तर तुम्हाला कळून येईल की अन्न किती मौल्यवान असते. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणून हे अन्न वाया जाणार नाही यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. आज आपण या पाठात धान्य पेरण्यापासून ताटात येणाऱ्या अन्नपर्यंतचा अन्नाचा प्रवास बघणार आहोत. आपल्याला रोजच लागणारा पदार्थ म्हणजे मीठ. हे मीठ तयार करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते आपण पाहू. समुद्राच्या किनारी भागात समुद्राचे पाणी साठविण्यासाठी वाफे तयार करतात. त्यात उधाण भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी भरले जाते. काही दिवसांनंतर त्याच्यातील पाणी वाफ होऊन निघून जाते. त्या वाफ्यांमध्ये पाण्यातील क्षार शिल्लक राहतात. हे क्षार म्हणजेच मीठ. हया मिठात अशुद्धे मिसळलेली असतात. म्हणून त्याची स्वच्छता करून, पॅकिंग करून, त्याची वाहतूक करून ते देशातील मोठ- मोठया व्यापारी केंद्रांमध्ये पोहचविले जाते. त्यानंतर ते छोटया दुकानांत पोहचविले जाते. आणि तिथून मग आपण मीठ खरेदी करून घरी घेऊन येतो. अशा तऱ्हेने मीठ तयार करण्यासाठी खूप वेळ श्रम, पैसा खर्च करावा लागतो. तेव्हा ते आपल्या पर्यंत पोहोचते.