दिशा व नकाशा

प्रस्तावना, सांगा पाहू!

views

4:53
तुम्ही सूर्य उगवताना व मावळताना पाहिला आहे का? नक्कीच कधी ना कधी किंवा रोजच तुम्ही तो पाहत असाल. तुमचे आजी-आजोबा एखाद्या वस्तूची दिशा सांगताना तुम्ही ऐकलं असेल ना? तिथे बघ मावळतीकडे किंवा उजव्या बाजूला, डाव्या बाजूला असे ते म्हणतात. आपल्याला एखाद्या वस्तूचे निश्चित स्थान सांगण्यासाठी दिशा माहीत असणे गरजेचे आहे. दिशांचा अभ्यास आपण मागील पाठात केला आहे. आज आपण दिशा व नकाशा यांचा अभ्यास करणार आहोत. दोन मुख्य दिशांच्या दरम्यान देखील अनेक वस्तू असतात. वस्तूंची दिशा निश्चित होण्यासाठी या उपदिशांचा वापर करता येतो. उपदिशा चार आहेत, त्या पुढीलप्रमाणे आहेत: १) ईशान्य २) आग्नेय ३) नैऋत्य ४) वायव्य. या चार उपदिशा आहेत. ४ मुख्य दिशा व ४ उपदिशा अशा मिळून ८ दिशा आहेत.