नकाशा व खुणा

प्रस्तावना

views

5:20
आपण एखादे चित्र बघितले की त्या चित्रातील विविध गोष्टी बघून त्यांची नावे सांगतो. कारण त्या चित्रात त्या गोष्टी जशाच्या तशा दाखविलेल्या असतात. नकाशामध्येही अनेक प्रकारच्या गोष्टी दाखविल्या जातात. उदा. डोंगर, शाळा, घरे, झाडे, नद्या इ. गोष्टी दाखविल्या जातात. परंतु, त्या जशाच्या तशा नसतात. त्यासाठी विशिष्ट खुणांचा वापर केला जातो. त्या खुणा सूचीमध्ये दिलेल्या असतात. त्यावरून आपल्याला त्या गोष्टी कोणत्या ते समजत असते. हे सर्व कशा पद्धतीने दाखविले जाते, हे आपण या पाठातून शिकणार आहोत.