वर - खाली

प्रस्तावना वर-खाली.

views

3:19
वर- खाली: मुलांनो, आज आपण वर - खाली म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. समजा, तुम्ही बिल्डींगच्या दुसऱ्या माळ्याच्या खिडकीतून खाली पाहिले तर तुम्हाला काय दिसेल? वि: बाई रस्ता, दुकाने, माणसे, घरे दिसतील. शि: छान! आणि तिथूनच तुम्ही वर पाहिले तर काय दिसेल? वरती आकाश, पक्षी, विमान आणि सूर्य दिसेल. शि: अगदी बरोबर! बरं सांगा आपल्या वर्गात वरती काय काय आहे? वि: बाई, वरती पंखा आणि छत आहे. शि: बरोबर! आणि पंख्याच्या खाली कोण-कोण बसले आहेत. वि: बाई पंख्याच्या खाली राहुल आणि सचिन बसला आहे. शि: बरोबर! सांगा हा खडू आणि डस्टर मी टेबलावर ठेवला आहे की टेबलाच्या खाली? वि: बाई तुम्ही खडू टेबलावर आणि डस्टर टेबलाच्या खाली ठेवला आहे. शि: अगदी बरोबर! तर अशाच प्रकारे आता आपण वर – खाली याचा सराव करू. शि : मी कुठे बसली आहे सांगा. वि : तुम्ही खुर्चीवर बसला आहात. शि : आणि माझे पाय कुठे आहेत? वि : तुमचे पाय टेबलाच्या खाली आहेत. शि: अगदी बरोबर उत्तरे दिलीत सर्वांनी! म्हणजे आता तुम्हाला वर आणि खाली म्हणजे काय ते छान समजले आहे.