फरक ओळखा

प्रस्तावना फरक ओळखा

views

2:21
फरक ओळखा : मुलांनो आज आपण एक खेळ खेळणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मी तुम्हांला दोन चित्रं दाखवणार आहे. ती दोन्ही चित्रे दिसायला सारखीच आहेत. पण त्यामध्ये काही फरक आहे. तो फरक कोणता आहे ते तुम्ही शोधून काढा. वि : हो, बाई. शि : हे पहा पहिले चित्र आणि हे दुसरे चित्र. आता सांगा बरं यांच्यात काय फरक आहे? वि: बाई, पहिल्या चित्रात दोनच पक्षी आहेत आणि दुसऱ्या चित्रात चार आहेत. शि : शाब्बास, अजून काही फरक दिसतो आहे का शोधा बरं. वि : बाई पहिल्या चित्रात मुलगा बॉलला किक मारतो आहे. आणि दुसऱ्या चित्रात मुलगी बॉलला किक मारते आहे. शि : अगदी बरोबर, म्हणजेच पहिल्या चित्रात मुलगा पुढे आहे आणि दुसऱ्या चित्रात मुलगी पुढे आहे. अजून काही फरक दिसतो आहे का या चित्रांत ? वि : बाई पहिल्या चित्रात मुलाने लाल पँट घातली आहे आणि दुसऱ्या चित्रात पिवळी पँट घातली आहे. आणि पहिल्या चित्रात चेंडू मोठा आहे आणि दुसऱ्या चित्रात छोटा चेंडू छोटा आहे. वि : बाई, पहिल्या चित्रात फुलपाखरू चेंडूच्या वरती आहे आणि दुसऱ्या चित्रात बाजूला आहे, पहिल्या चित्रात एक फुल दिसते आहे आणि दुसऱ्या चित्रात एकही फुल दिसत नाही. आणि बाई, मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये पहिल्या चित्रात छोटे गवत आहे. दुसऱ्या चित्रात मोठे गवत आहे. शि : शाब्बास मुलांनो तुम्ही या दोन्ही चित्रांतील फरक अगदी बरोबर ओळखला आहे. शि : आणि पाहिलंत आपण फरक ओळखा या खेळातून, आधी - नंतर, पुढे – मागे, खाली – वर, एक – अनेक यांचाही सराव केला. हो की नाही. वि : हो, बाई.