७ ची ओळख व लेखन

प्रस्तावना ७ ची ओळख व लेखन

views

3:24
७ ची ओळख व लेखन: आज आपण ७ ची ओळख आणि लेखन शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सांगा बरं, पुढील चित्रात काय दिसते आहे? वि : बाई रंग दिसत आहेत. शि :बरोबर, पण तुम्हाला माहीत आहे का हे कशाचे रंग आहेत हे? तर हे इंद्रधनुष्याचे रंग आहेत. यात एकूण सात रंग असतात. पहा तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. शि : आता हे चित्र पहा, आणि मला मोजून सांगा या चित्रात एकूण किती बाहुल्या आहेत? वि: एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. एकूण सात बाहुल्या आहेत. शि : बरोबर. शि : आणि या चित्रांत किती बदकं आहेत? वि : बाई यातही सातच बदकं आहेत. शि : अगदी बरोबर! आता या सर्व मण्यांपैकी तुम्ही मला एकूण सात मणी काढून दाखवा पाहू. वि : १,२,३,४,५,६,७.शि: मुलांनो आपण “७” ची ओळख करून घेतली. आता ‘७’ चे लेखन करूया. शि: हे पहा इथे ठिपक्यांच्या मदतीने ७ या अंकाचा आकार काढला आहे. प्रथम आपण या आकारावरून पेन्सिल फिरवून सराव करू. आणि नंतर स्वतंत्रपणे ७ हा अंक काढू.