कमी - जास्त Go Back प्रस्तावना कमी - जास्त views 3:55 कमी - जास्त: शि: मुलांनो, आज आपण कमी आणि जास्त म्हणजे काय? ते समजून घेणार आहोत. आता मी तुम्हाला दोन चित्रं दाखवणार आहे, त्यात किती चॉकलेटं आहेत ते सांगा. शि: मुलांनो, पहिल्या चित्रात किती चॉकलेटं आहेत आणि दुसऱ्या चित्रात किती चॉकलेटं आहेत? वि: बाई, पहिल्या चित्रात पाच चॉकलेटं आहेत आणि दुसऱ्या चित्रात तीन चॉकलेटं आहेत. शि: शाब्बास. पहिल्या चित्रात पाच चॉकलेटं आहेत आणि दुसऱ्या चित्रात तीन चॉकलेटं आहेत म्हणजेच पहिल्या चित्रात जास्त चॉकलेटं आणि दुसऱ्या चित्रात कमी चॉकलेटं आहेत.अशा प्रकारे आता मी अजून काही चित्रं दाखवते. त्यामध्ये तुम्ही कमी आणि जास्त यांतील फरक ओळखा. शि: हे पहा, या पहिल्या दोन्ही चित्रांत मुले दाखवली आहेत. यातील जास्त मुले असलेल्या चौकटीत रंग कोण भरेल बरं? वि: बाई, मी रंगवतो. इथे हे या पहिल्या चित्राच्या चौकटीत रंग भरावा लागेल. कारण यातील पहिल्या चित्रांत ५ मुले आहेत. आणि दुसऱ्या चित्रांत दोनच मुले आहेत. शि: शाब्बास! प्रस्तावना कमी - जास्त