चला, बेरीज करूया!

शून्य मिळवणे

views

6:20
शून्य मिळवणे: मुलांनो, आता आपण अंकांमध्ये शून्य मिळवणार आहोत. त्या आधी सांगा शून्य म्हणजे काय? वि : शून्य म्हणजे काहीच नाही. शि : अगदी बरोबर. आता हे पहा माझ्याकडे २ संत्री आहेत. आणि मी त्यात शून्य संत्री मिळवते. मग माझ्याकडे एकूण किती संत्री होतील? मी यात शून्य संत्री मिळवली म्हणजे किती संत्री मिळवली? वि : बाई काहीच नाही मिळवली. म्हणजे तुमच्याकडील २ संत्र्यांमध्ये काहीच संत्री मिळवली नाहीत. म्हणून पुन्हा २ च संत्री होतील. शि : अगदी बरोबर! पाहिलंत, दोन संत्र्यांमध्ये शून्य मिळवले म्हणून उत्तर आले दोनच. म्हणजे कोणत्याही अंकात शून्य मिळवले की उत्तर तीच संख्या येते. आता आपण अशाच काही आणखी गणितांचा सराव करू. शि: ४ आंबे + ० आंबे = ? आंबे. वि: ४ आंबे. शि: ८ केळी + ० केळी = ? केळी. वि: ८ केळी. शि: ५ चिकू + ० चिकू = ? चिकू. वि: ५ चिकू. शि: १ सफरचंद + ० सफरचंद = ? सफरचंद. वि: १ सफरचंद. शि: अगदी बरोबर!