दहाची ओळख व लेखन

प्रस्तावना दहाची ओळख व लेखन

views

4:10
दहाची ओळख व लेखन: शि: आज आपण १० ची ओळख व लेखन शिकणार आहोत. त्याआधी आपण १ ते ९ या अंकांची उजळणी करूया. मुलांनो, म्हणा एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. वि: एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. शि: शाब्बास! मुलांनो, माझ्या हातात नऊ खडू आहेत आणि एक खडू मी टेबलावरून घेतला म्हणजेच माझ्याकडे एकूण दहा खडू झाले. म्हणजेच नऊ आणि एक मिळून होतात दहा. मग माझ्या सोबत म्हणा, नऊ आणि एक दहा. वि: बाई, नऊ आणि एक दहा. मुलांनो, आता दहाचे लेखन करायला शिकूया. त्याआधी १० च्या लेखनाची मी एक छोटीशी कविता म्हणते ती तुम्ही ऐका. १ ते ९ नवीन चिन्हे प्रत्येकाला, लांबट गोल हे शून्याला. नकोत चिन्हे नवीन अजून, दाखवू संख्या त्यांच्याच मधून दहाला नवीन चिन्ह नाही बरे! ते कसे लिहायचे ते पाहू खरे! दहा असे लिहायचे १०! शि: आहे ना छान कविता! आता हे पहा इथे ठिपक्यांच्या मदतीने १० या अंकाचा आकार काढला आहे. प्रथम आपण या आकारावरून पेन्सिल फिरवून सराव करू. आणि नंतर स्वतंत्र १० हा अंक काढू.