दशक समजून घेऊ !

प्रस्तावना दशक समजून घेऊ!

views

4:55
दशक समजून घेऊ! : शि: मुलांनो, आज आपण दशक समजून घेणार आहोत, शि; आपण १ ते ९ संख्यांचे लेखन करतो तेव्हा फक्त एकच चिन्ह घेतो. पण १० चे लेखन करताना दोन चिन्हे घ्यावी लागतात. म्हणजेच १ व ० ही दोन चिन्हे लिहितो. आपण असे का करतो हे आज आपण समजून घेणार आहोत. नेहमी लक्षात ठेवा: दोन संख्या असलेल्या अंकामध्ये डावीकडील संख्या दशक आणि उजवीकडील संख्या ही एकक असते. म्हणजेच १० या संख्येतील १ हा दशक आणि ० हा एकक आहे. पहा, माझ्या हातात १० फुले आहेत. ही सुट्टी म्हणजेच वेगवेगळी आहेत म्हणून ती १० आहेत. पण मी आता ही सर्व फुले एकत्र करते आणि त्यांचा १ एक गुच्छ तयार करते. आता तुम्हाला काय दिसते आहे? १० फुले दिसताहेत की १ गुच्छ दिसतो आहे. वि: बाई १० फुले एकत्र बांधल्यामुळे १ गुच्छ दिसतो आहे. शि: बरोबर! तर या १० फुलांचा १ गुच्छ म्हणजे १ दशक असतो. आणि दशकाची मांडणी करताना कधीही २ घरांमध्ये करायची असते. पहिले घर असते एककाचे आणि दुसरे घर असते दशकाचे.