११ ते २० ची ओळख व लेखन

प्रस्तावना ११ ते २० ची ओळख व लेखन

views

4:59
११ ते २० ची ओळख व लेखन: आपण एक ते दहाची ओळख व लेखन शिकलो. आता आपण ११ ते २० ची ओळख करून घेणार आहोत. शि: या पहा माझ्या हातात काही माचीसच्या काडया आहेत. त्या कोण मोजून दाखवेल. वि: बाई मी.. शि: बरं... वि: १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११. बाई ११ काडया आहेत. शि: बरोबर! आता या ११ काडयातून दशक तयार होतो का पहा? वि: हो बाई. हे पहा १० काडयांचा गठ्ठा तयार झाला. आणि ही १ काडी शिल्लक राहिली. शि: छान! आपण दशकाची ओळख करताना त्याचे लेखन कसे करायचे ते शिकलो आहोत. मग मला सांगा या ११ मध्ये दशक म्हणजेच गठ्ठे किती आहेत? वि: बाई १ गठ्ठा आहे. शि: बरोबर! म्हणून मी दशकाच्या घरात १ लिहिला. आता एकक म्हणजे सुट्ट्या काडया किती आहेत? वि: बाई सुट्टी काडी पण एकच आहे. शि: बरोबर! म्हणून मी एककाच्या घरात १ लिहिला. म्हणजेच मुलांनो १० आणि १ होतात अकरा. किंवा तुम्ही असेही म्हणू शकता एक दशक आणि एक एकक मिळून झाले अकरा. आणि ११ या संख्येचे लेखन ११ असे करतात. अशाच प्रकारे पुढील ११,१२,१३,१४ ते २० पर्यंत संख्या तुम्ही सहज तयार करू शकता.