एक अपूर्व सोहळा Go Back राज्याभिषेक का केला? views 3:16 मुलांनो, तुम्हाला आता माहीत आहे की महाराजांच्या जन्मापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र व भारतही परकीयांच्या गुलामगिरीत होता. आपल्या प्रदेशातच आपण मनाप्रमाणे राहू शकत नव्हतो. याची खंत जिजामातांना व शाहाजीराजे यांना होती. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाच्या मनात लहानपणापासूनच स्वराज्याचे बीज पेरले होते. आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनीही अगदी लहान वयातच आपल्या बाल सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. . जीवाला जीव देणारे व महाराजांवरून आपला जीव ओवाळून टाकणारे कितीतरी मावळे होते. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादींनी तर स्वराज्यासाठी लढता-लढता आपले प्राण गमावले. त्यांच्या बलिदानातूनच स्वराज्य उभे राहिले. त्यामुळे स्वराज्याची व शिवाजी महाराजांची भीती शत्रूच्या मनात चांगलीच बसली होती. मुलांनो, स्वराज्य निर्माण झाले हे फक्त शिवरायांना व महाराष्ट्रातील जनतेलाच माहीत होते. ते सर्व जगाला माहीत व्हावे, देशातील इतर संस्थानिकांना व राजांना माहीत व्हावे, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करावयाचे ठरविले. शेकडो वर्षे महाराष्ट्रातील जनता परकीय लोकांच्या गुलामगिरीत राहत होती. प्रजेला समानतेची, आपलेपणाची वागणूक देणारा एकही राजा अनेक वर्षांत झाला नव्हता. हे त्यांनी स्वत:च्या सुखासाठी किंवा त्यातून आपल्याला संपत्ती, धन, वैभव प्राप्त करता यावे, यासाठी केले नाही, तर हे केले त्यांनी स्वराज्य अजून मजबूत व भक्कम होण्यासाठी. राज्याभिषेक का केला? स्वराज्याची राजधानी राज्याभिषेक सोहळा