एक अपूर्व सोहळा Go Back स्वराज्याची राजधानी views 3:23 मुलांनो, प्रत्येक राज्याची किंवा देशाची एक राजधानी असते. आपल्या देशाची राजधानी दिल्ली आहे, तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. राजधानी का असते? तर या ठिकाणाहून संपूर्ण देशाचा किंवा राज्याचा कारभार पाहणे सोयीचे होते. म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. तसेच रायगडावरून स्वराज्यावर, स्वराज्यातील प्रदेशांवर देखरेख ठेवणे सोपे होते. तसेच रायगडावरून शत्रूवर देखरेख ठेवणेही सोयीचे ठरणार होते. म्हणून महाराजांनी राजधानी म्हणून रायगडाची निवड केली. समारंभाची तयारी: छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या राज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. शिवाजी महाराजांनी दोन फूट लांब व दोन फूट रुंद असे सोन्याने मढवलेले सिंहासन राज्याभिषेकासाठी तयार करून घेतले. तसेच त्याला मौल्यवान रत्ने लावली होती. त्यावर पांढरे शुभ्र छत्र बसवले होते. शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून म्हणजेच सर्व भागांतून विद्वान ब्राह्मण, सरदार, कामदार, राजेरजवाडे व इतर लोक रायगडावर जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची उत्तम व्यवस्था रायगडावर करण्यात आली होती. ब्राह्मण, सरदार, राज्यातील श्रीमंत लोक, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित होते. राज्याभिषेक का केला? स्वराज्याची राजधानी राज्याभिषेक सोहळा