एक अपूर्व सोहळा

राज्याभिषेक सोहळा

views

5:30
राज्याभिषेक सोहळा: ६ जून १६७४ हा राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महाराजांसाठी व संपूर्ण स्वराज्यासाठी महामंगल असा दिवस होता तो. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि विधीपूर्वक आंघोळ करून, कुलदेवतेचे स्मरण करून, प्रमुख ब्राह्मणांच्या पाया पडून झाल्यावर महाराजांच्या राज्याभिषेकास सुरुवात झाली. रायगडावर वाद्ये वाजू लागली. गाणी म्हणणारे गवई गाऊ लागले. सगळीकडील वातावरण मांगल्याचे, आनंदाचे झाले. राज्याभिषेक सुरु झाला. यावेळी शिवरायांनी शुभ्र वस्त्रे अंगावरती घालती होती. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा होत्या. त्यांच्यावर विविध प्रकारे सजवलेले छत्र धरण्यात आले. तूप, दही, मध यांनी भरलेले कलश पुरोहितांच्या हातात होते. गागाभट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे व समुद्राचे पाणी भरलेले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची बातमी सर्व जगाला समजली. या सोहळ्याचे भव्यदिव्य रूप व त्यावर अफाट केलेला खर्च पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली. अशा प्रकारे आदिलशाहाच्या व निजामशाहाच्या दरबारी सरदार असणाऱ्या शाहजी राजांच्या मुलाने सर्व जनतेला गुलामीतून मुक्त करून स्वत:चे स्वतंत्र राज्य निर्माण केले. “स्वराज्य” निर्माण केले. अशा या महान राजास मनाचा मुजरा!