आकृतिबंध

गुणाकारातील आकृतिबंध

views

3:41
गुणाकारातील आकृतिबंध: आता आपण एक गुणाकारातील आकृतिबंध पाहूया. आता हा ९ चा पाढा पहा, या पाढ्यातील एककस्थानी येणारा पहिला अंक ९ आहे. आणि उतरत्या क्रमाने तो १ ने कमी होत आहे. म्हणजेच ९, ८,७, ६, ५ अशा क्रमाने तो कमी होत आहे. आणि दशकस्थानातील अंक जर पाहिले तर ९ पासून १ पर्यंत तो चढत्या क्रमाने १ ने वाढत आहे. या ९ च्या पाढ्यात उलटक्रमाने व सरळक्रमाने येणाऱ्या संख्याचा आकृतिबंध तयार झालेला आहे. आता आपण सरावासाठी काही उदाहरणांचा अभ्यास करूया. उदा:1) खाली दिलेल्या ५ च्या पाढ्याचे निरीक्षण करा. ५, १०, १५, २०, २५, ३०, ३५, ४०, ४५, ५०, ५५, ६०, ६५, ७०, ७५ या पाढयातील एकक स्थानाच्या अंकातील आकृतिबंध पहा. यामधील एककस्थानी असलेल्या अंकात एक आकृतिबंध आहे. म्हणजेच प्रथम ५ व नंतर 0 असा हा क्रम असून तो पुढे चालू आहे. दशकस्थानी असलेल्या अंकाचे निरीक्षण केले तर असे दिसून येते की एका अंकाची दोनदा पुनरावृत्ती झालेली आहे, जसे एक एक, दोन दोन, तीन तीन, चार चार, पाच पाच, सहा सहा, सात सात इत्यादी म्हणून दशकस्थानी असलेल्या अंकातही आकृतिबंध आहे.