२१ ते ३० ची ओळख व लेखन

प्रस्तावना २१ ते ३० ची ओळख व लेखन

views

3:09
२१ ते ३० ची ओळख व लेखन : मुलांनो तुम्ही १ ते २० संख्या लिहायला शिकला आहात. आज आपण २१ ते ३० अंक लिहायला शिकणार आहोत. शि: माझ्या हातात एकूण एकवीस माचीसच्या काड्या आहेत, मी दहा दहाचे असे वेगवेगळे दोन गठ्ठे तयार केलेले आहेत, आणि ही एक काडी शिल्लक राहिली आहे. माझ्याकडे एकूण किती काड्या आहेत? वि: सर, एकवीस काड्या आहेत. शि: बरोबर, म्हणून याठिकाणी मी दशकाच्या घरात २ लिहिला आणि एककाच्या घरात १ लिहिला. म्हणजेच २० आणि १ होतात वीस एक किंवा एकवीस. आपण असेही म्हणू शकतो की दोन दशक आणि एक एकक मिळून झाले एकवीस. आणि २१ या संख्येचे लेखन २१ असे करतात. तर आता आपण २१ ते ३० या संख्यांचे वाचन करू.