सर्वात उंच – सर्वात ठेंगणा

प्रस्तावना सर्वात लांब – सर्वात ठेंगणा

views

3:17
सर्वात उंच – सर्वात ठेंगणा: शि: मुलांनो, मागच्या पाठात आपण उंच आणि ठेंगणा म्हणजे काय हे समजून घेतले. आज आपण सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणा कशाला म्हणतात ते बघणार आहोत. इथे मी, सूरज आणि कोमल तिघेजण उभे आहोत. तर मग सांगा आमच्या तिघांमध्ये सर्वात मोठे आणि लहान कोण दिसते आहे? वि: बाई, तुम्ही मोठ्या दिसता आहात आणि कोमल लहान दिसते आहे. शि: शाब्बास म्हणजेच आमच्या तिघांमध्ये मी सर्वात उंच आहे आणि कोमल सर्वात ठेंगणी आहे. आता या पहा तीन वस्तू मी टेबलावर ठेवल्या आहेत. यात एक लाकडी पट्टी आहे. पेन्सिल आहे. आणि खोडरबर आहे. मग यातील सर्वात ठेंगणी वस्तू कोणती आहे. वि: बाई, यातील खोडरबर ही वस्तू सर्वात ठेंगणी आहे. खोडरबरची उंची अगदीच कमी आहे. शि: छान! अशा प्रकारे मुलांनो जी गोष्ट किंवा वस्तू आपल्याला उंचीला सर्वात जास्त मोठी दिसते तिला सर्वात उंच असे म्हणतात. आणि जी गोष्ट किंवा वस्तू आपल्याला उंचीमध्ये अगदी लहान दिसते तिला सर्वात ठेंगणा असे म्हणतात.