द्रव्यांचे संघटन

द्रव्यांचे रासायनिक संघटन

views

4:38
रासायनिक संघटन हा निकष वापरूनही द्रव्यांचे वर्गीकरण करता येते. द्रव्याचे लहानात-लहान कण एकसारखे आहेत, की वेगवेगळे आहेत किंवा कशापासून बनले आहेत यावरून द्रव्यांचे तीन प्रकार पडतात: मूलद्रव्य, संयुग व मिश्रण. मूलद्रव्य – ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्ये म्हणतात. संयुग- दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजेच संयुग होय. त्याचे लहानात लहान कण(रेणू) हे दोन किंवा अधिक प्रकारचे अणू एकमेकांना जोडून बनलेले असतात. मिश्रण- वेगवेगळी मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकांत मिसळली की मिश्रण तयार होते. मिश्रणाचे लहानात लहान कण म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्य किंवा संयुगांचे अणू किंवा रेणू असतात. एका मुलद्र्व्यातील किंवा एका संयुगातील सर्वात लहानात लहान कण म्हणजे अणू किंवा रेणू. मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणांमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. हे आताच पाहिले. आता आपण त्याचे उदाहरण पाहू: ऑक्सिजनच्या प्रत्येक रेणूमध्ये ऑक्सिजनचे दोन अणू जोडलेल्या स्थितीत असतात. तर संयुगाचे लहानात लहान कण म्हणजेच रेणू हे दोन किंवा अधिक प्रकारचे अणू एकमेकांना जोडून बनलेले असतात. उदा: पाणी. पाण्याच्या प्रत्येक रेणूमध्ये हायड्रोजनचे दोन अणू हे ऑक्सिजनच्या एका अणूला जोडलेल्या स्थितीत असतात. मिश्रणाचे लहानात लहान कण म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्ये, संयुगाचे अणू किंवा रेणू असतात. उदा: हवा. हवा या मिश्रणामध्ये नायट्रोजन(N2) ऑक्सिजन (O2), ऑरगॉन(Ar), पाणी(H2O), (कार्बन डाय ऑक्साइड)CO2 हे प्रमुख घटक रेणू असतात. तसेच पितळ ह्या मिश्रणात तांबे (Cu) व जस्त (Zn) ह्या मूलद्रव्यांचे अणू असतात. तर ब्राँझमध्ये तांबे (Cu) व कथिल (Sn) ह्या मूलद्रव्यांचे अणू असतात.