आपत्ती व्यवस्थापन

आग

views

3:50
आग लागणे हीदेखील एक आपत्ती आहे. आग ही वेगवेगळया प्रकारची असू शकते. शॉर्टसर्किटमुळे आग लागली, जंगलात वणवा भडकला, घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली अशी अनेक आगीची कारणे असतात. सर्वप्रथम तुम्ही मला सांगा आग ही नैसर्गिक आपत्ती आहे की मानवनिर्मित आपत्ती आहे? आग ही नैसर्गिक किंवा मानवनिर्मितही आपत्ती असू शकते. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित अशा दोन्ही कारणांमुळे आग लागू शकते. उन्हाळयात जंगलात उष्णतेमुळे वणवे लागतात. झाडांच्या घर्षणामुळे जंगलात लागणारी आग ही नैसर्गिक कारणामुळे लागते तर कधी-कधी दंगली होतात किंवा काही वैयक्तिक कारणामूळे कोणी जाळपोळ करतात ती मानवनिर्मित आग. किंवा चुकून कधी कोणत्या व्यक्तीच्या हाताने आग लागते. हलगर्जीपणामुळे गोदामांत आग लागते. हया मानवनिर्मित कारणांमुळे लागणाऱ्या आगी होत.