संच

विश्वसंच

views

3:09
आपण ज्या संचांचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच विश्वसंच म्हणून घेता येतो. त्याच्या बाहेरील घटकांचा आपण विचार करत नाही. विचारात घेतलेला प्रत्येक संच विश्व संचाचा उपसंच असतो. खाली दिलेल्या उदाहरणाच्या सहाय्याने आपण विश्व संच समजून घेऊया. उदाहरण 1: आपल्या शाळेतील वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या 9 वी च्या काही विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी 9 वी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या संचाचा विचार करावा लागेल. येथे शाळेतील 9 वी च्या सर्व विद्यार्थ्यांचा संच विश्वसंच म्हणून घेऊ. उदाहरण 2: आपल्या शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या मुलांतून 15 मुलांचा संघ निवडायचा आहे. तर शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा संच हा विश्वसंच होवू शकतो. त्यातील 15 खेळाडूचा संघ हा त्या विश्वसंचाचा उपसंच आहे. हे या वेन आकृतीच्या सहाय्याने पहा. विश्वसंच साधारणपणे ‘u’ या अक्षराने दर्शवतात. आणि वेन आकृतीमध्ये विश्वसंच सामान्यत: आयताने दाखवतात.