गुरुत्वाकर्षण

माहीत आहे का तुम्हांला?

views

4:43
पृथ्वीवरील एका स्थानावर g चे मुल्य सगळया वस्तूंसाठी एकसमान असते. म्हणून आपण कुठल्याही दोन वस्तू, एकाच उंचीवरून सोडल्यास एकाच वेळी जमिनीवर पोहोचतात. त्यांचे वस्तुमान व इतर कुठल्याही गुणधर्माचा या कालावधीवर परिणाम होत नाही. हा प्रयोग प्रत्यक्ष गॅलिलिओने सुमारे इ.स.१५९० मध्ये इटली या देशातील पिसा या शहरात केला. गॅलिलिओने दोन वेगवेगळया वस्तुमानाचे गोल तेथील झुकलेल्या मनो-यावरून एकाच वेळेस खाली सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पडतात हे सिद्ध केले. समजा, आपण एक जड दगड आणि एक पीस जर उंचावरून एकाच वेळेस सोडले तर ते एकाच वेळी जमिनीवर पोहचताना दिसतील का? तर नाही. कारण पिसाचे हवेशी घर्षण होते. तसेच पिसावर प्लावक बल प्रयुक्त होते. त्यामुळे पीस तरंगत हळूहळू जमिनीवर खाली येते व दगडापेक्षा उशीराने पोहचते. तसेच दगडाचे वजन हे हवेमुळे प्रयुक्त होणाऱ्या बलापेक्षा जास्त असते. त्यामुळे दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास ते कमी पडते. परंतु शास्त्रज्ञांनी हा प्रयोग निर्वातात म्हणजे (हवा नसलेल्या ठिकाणी) केला असून दगड व पीस दोन्ही वस्तू एकाच वेळेस जमिनीवर पोहचतात हे सिद्ध केले आहे.