उष्णता

पुनर्हिमायन

views

3:42
पुनर्हिमायन - बर्फाचा गोळा कसा तयार केला जातो ते सांगा. बर्फाचा मोठा तुकडा घेवून त्याला किसून काडीच्या टोकाशी हाताने दाबून गोळा बनविला जातो.परंतु हा किसलेला बर्फ पुन्हा घट्ट गोळा कसा बनतो? हा प्रश्न पडतोच. तसेच दोन बर्फाचे खडे घेऊन एकमेकांवर दाबून धरल्यास काही वेळाने ते खडे एकमेकांना घट्ट चिकटतात हे आपण पाहिले आहे, हे कशामुळे घडते ते आपण एका प्रयोगातून पाहूया. कृती: प्रथम एक बर्फाची लादी स्टॅण्डवर ठेवा. नंतर एक तार घेऊन तिच्या दोन्ही टोकाला समान वजने बांधा. समान वजने बांधलेली तार बर्फाच्या लादीवर ठेवून काय घडते ते निरीक्षण करा. थोडावेळ निरीक्षण केले असता, आपल्या लक्षात येते की, समान वजने बांधलेली तार बर्फाच्या लादीवर ठेवल्यास तार हळूहळू रुतत बर्फाच्या लादीत खोलवर जाते. आणि काही वेळाने बर्फाच्या लादीतून बाहेर पडते. तार बाहेर पडली तरीही बर्फ तुटत नाही हे आपल्याला निरीक्षणातून कळते. हे असे घडते कारण दाबामुळे बर्फ वितळतो व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होतो या प्रक्रियेलाच पुनर्हिमायन असे म्हणतात. बर्फावर एखाद्या वस्तूचा दाब पडतो त्या दाबामुळे बर्फाचा द्रवणांक शून्यापेक्षा कमी होतो. म्हणजेच 00C तापमानास बर्फाचे पाण्यात रूपांतर होते तर दाब काढून घेताच द्रवणांक पूर्ववत होतो. म्हणजे 00C होतो व पाण्याचे पुन्हा बर्फात रूपांतर होते.