उद्योग

औद्योगिक विकास

views

5:02
सर्व प्रकारचे घटक उद्योगांसाठी उपलब्ध असतील परंतु उद्योगच नसेल तर त्या घटकांचा उपयोग होणार नाही. उदा: एखाद्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन होते. परंतु त्या प्रदेशात ऊस कारखानाच नसेल, तर त्या उसाचा म्हणावा तेवढा फायदा होणार नाही. म्हणून औद्योगिक विकास होणे, खूप गरजेचे असते. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाच्या औद्योगिक विकासावर अवलंबून असतो. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व त्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगीकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे त्या देशातील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न होय. तसेच औद्योगीकरण म्हणजे एखाद्या प्रदेशात उद्योगांची सुरुवात व त्यांचा विकास होण्याची प्रक्रिया होय. उद्योगांचा विकास झाल्यामुळे देशातील नागरिकांना रोजगार मिळतो. त्यामुळे बेरोजगारी, दारिद्रय, भूकबळी यांसारखे प्रश्न आपोआपच सुटतात. त्यामुळे देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावते, तसेच सर्वांना रोजगार उपलब्ध झाल्याने देशाचे दरडोई उत्पन्न वाढते. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते. स्थूल उत्पन्न म्हणजे देशाच्या एकूण उत्पन्नात वाढ होते. उद्योगातून तयार होणाऱ्या पक्क्या मालाला कच्च्या मालापेक्षा किती तरी पटीने जास्त किंमत प्राप्त होते. असा पक्का माल इतर देशांमध्ये पाठविला जातो. त्यामुळे देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ होते. उदाहरणार्थ: जर आपल्या देशात उत्पादित होणारा कापूस इतर देशांमध्ये पाठविला तर त्याला जास्त किंमत मिळणार नाही. परंतु त्याऐवजी जर आपण त्या कापसापासून कापड बनवून ते दुसऱ्या देशांना निर्यात केले तर त्यातून चांगले पैसे प्राप्त होतील. तसेच ते कापड बनविण्यासाठी उद्योग उभे राहतील व त्यातून येथील लोकांना रोजगार मिळेल.