सांख्यिकी

सांख्यिकी

views

03:58
एखाद्या मोठ्या समूहाचा अभ्यास करण्यासाठी त्यातील काही घटकांचा पुरेसा लहान गट यादृच्छिक पद्धतीने निवडतात. हा मोठ्या गटाचा प्रतिनिधिक गट असतो. या प्रतिनिधिक गटाची अभ्यासासंबंधित माहिती जमा करतात. ही माहिती बहुतेक वेळा सांख्यिक स्वरूपात असते. तिथे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढतात. या प्रकारच्या अभ्यासाला सांख्यिकी म्हणजेच Statistics असे म्हणतात. Statistics हा शब्द Status या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ राज्यातील स्थिती असा होतो. यावरून पूर्वी सांख्यिकी हे शास्त्र राज्याच्या प्रशासकीय व्यवहाराशी संबंधित होते असे दिसते. परंतु सध्या या शास्त्राचा उपयोग सर्वच क्षेत्रांत केला जातो. सर रोनाल्ड ऐल्मर फिशर ह्यांना संख्याशास्त्राचे जनक मानतात. त्यांचा आयुष्यकाल 1820 ते 1962 असा होता. माहितीचे संकलन कसे करावे? त्यातील प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री म्हणजे काय ते आपण आता समजून घेऊ. एका गावातील प्रत्येक कुटुंबाकडे किती शेती आहे ही माहिती संकलित करायची आहे. काय कराल? गावातील प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकाकडे किती शेती आहे याची नोंद करू. एखाद्या विशिष्ट समूहाविषयी आपण जी माहिती एकत्र करतो ती प्रामुख्याने संख्यांच्या स्वरूपात असते. तिला सामग्री म्हणतात. सामग्री संकलित करण्यापूर्वी ती आपण कशासाठी वापरणार आहोत हे माहीत असायला हवे. जर एखाद्या व्यक्तीने माहिती घेण्याच्या ठिकाणी जाऊन प्रश्न विचारणे, मोजदाद करणे इत्यादी प्रकारे सामग्रीचे संकलन केले तर त्या सामग्रीला प्राथमिक सामग्री म्हणतात.