निर्देशक भूमिती

जाणून घेऊया दिलेल्या निर्देशकांशी निगडित बिंदू स्थापन करणे

views

03:50
P(4, 3) व Q(-2, 2) हे बिंदू स्थापन करायचे आहेत. तर हे बिंदू आपल्याला पुढील पायऱ्यांच्या मदतीने स्थापन करता येतील. बिंदू स्थापन करण्याच्या पायऱ्या: 1)सर्व प्रथम प्रतलात Χ- अक्ष व Y अक्ष काढा. आणि आरंभबिंदू O दाखवा. जिथे हे दोन अक्ष छेदतात तो त्याचा आरंभबिंदू असतो. 2) P(4, 3) हा बिंदू दाखवण्यासाठी Χ अक्षावरील 4 ही संख्या दाखवणाऱ्या बिंदूतून Y अक्षाला समांतर रेषा काढा. Y अक्षावरील 3 ही संख्या दाखवण्यासाठी Χ अक्षाला समांतर रेषा काढा. आता या दोन्ही रेषा जिथे छेदतात त्यांच्या छेदनबिंदूला P हे नाव द्या व तिथे (4, 3) असे लिहा. दोन्ही संख्या धन असल्यामुळे बिंदू P पहिल्या चरणात आहे. आता Q (-2, 2) हा बिंदू दाखवण्यासाठी Χ अक्षावरील -2 ही संख्या दाखवणाऱ्या बिंदूतून Y अक्षाला समांतर रेषा काढा. Y अक्षावरील 2 ही संख्या दाखविणाऱ्या बिंदुतून Χ अक्षाला समांतर रेषा काढा. या दोन रेषा जिथे छेदतात तेथे Q हा बिंदू लिहा. Q हा बिंदू दुसऱ्या चरणात येतो, R(-3, -4) बिंदू R स्थापन करण्यासाठी Χ अक्षावरील ऋण 3 व y अक्षावरील ऋण चार जोडून घ्या. हे दोन बिंदू जिथे छेदतात त्याला R हे नाव द्या. बिंदू R हा तिसऱ्या चरणात येतो. S(3, -1) Χ अक्षावरील 3 या संख्येतून Y अक्षाला व Y अक्षावरील ऋण 1 या संख्येतून Χ अक्षाला समांतर रेषा काढा व त्यांच्या छेदनबिंदूला S हे नाव द्या. बिंदू S हा चौथ्या चरणात आहे. आलेख कागदावर खालील बिंदू स्थापन करा. A(5, 4), B(2, 4), C(-2 4), D(-4, 4), E(0, 4), F(3, 4). प्रथम आलेख कागदावर प्रतलात Χ- अक्ष व Y अक्ष काढून घ्या व दिलेले बिंदू स्थापन करून घ्या. सर्व बिंदूचा y निर्देशक समान आहे. म्हणजेच 4 आहे. सर्व बिंदू जोडले तर रेषा तयार होते, म्हणून सर्व बिंदू एकरेषीय आहेत. या सर्व बिंदूंतून काढलेली रेषा χ अक्षाला समांतर असेल. रेषा DA वरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशक समान म्हणजे 4 आहे. तो स्थिर आहे. म्हणून रेषा DA चे वर्णन y=4 या समीकरणाने करतात. कोणत्याही बिंदूचा y निर्देशक 4 असेल तर तो बिंदू त्या रेषेवर म्हणजे रेषा DA वर असेल. Χ-अक्षाला 4 एकक अंतरावर समांतर असलेल्या रेषेचे समीकरण y=4 आहे.