अवकाश मोहिमा

उपग्रहांचे प्रकार

views

04:20
मुलांनो, या तक्त्यात उपग्रहांचे प्रकार, त्यांचे कार्य आणि भारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे दिली आहेत. हा तक्ता नीट पाहा. यांची आता आपण थोडक्यात माहिती घेऊ.हवामान उपग्रह: हवामान उपग्रह हा कृत्रिम उपग्रहाचा एक प्रकार आहे. या ग्रहाचे कार्य म्हणजे हवामानाचा अभ्यास करणे आणि हवामानाचा अंदाज वर्तवणे होय. उदाहरणार्थ, कोणत्या भागात अतिवृष्टी होईल किंवा चक्री वादळाची निर्मिती होईल इत्यादी. भारताच्या उपग्रहमालिका म्हणजे INSAT (Indian National Satellite) व GSAT (Geosynchronous satellite) हे उपग्रह हवामानविषयक सर्व बाबींचा सतत आढावा घेतात.