ध्वनी

गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण

views

4:29
आपल्या अवती-भोवती अनेक प्रकारचे आवाज असतात. . या आवाजांपैकी काही आवाज आपल्याला आवडतात तर काही आवाज त्रास देणारे असतात. मोठ्या, किंवा सततच्या कर्कश आवाजामुळे त्या ठिकाणच्या लोकांवर अनेक वाईट परिणाम होतात. या कर्कश आवाजामुळे लोकांची ऐकण्याची क्षमता कमी होऊन ते बहिरे होऊ शकतात. अखंड गोंगाट असेल तर अशा परिस्थितीत मानसिक थकवा जाणवतो, व्यक्तीची चिडचिड होते, नीट लक्ष देऊन काम करता येत नाही. अशा प्रकारच्या, ऐकण्यास त्रासदायक असणाऱ्या ध्वनीलाच ध्वनी प्रदूषण असे म्हणतात.