अपूर्णांक

पूर्णांकयुक्त अपूर्णांक

views

3:27
पूर्णांकयुक्त अपूर्णांक :- आतापर्यंत अपूर्णांक व त्यांचे वाचन – लेखन, बेरीज – वजाबाकी, गुणाकार अशा विविध उदाहरणांचा आपण अभ्यास केला. आता आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक ही संकल्पना समजून घ्यायची आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय? त्याच्या नावातच त्या संकल्पनेचा अर्थ दडलेला आहे . म्हणजेच बघा पूर्ण संख्या आणि अपूर्ण संख्या एकत्रितपणे लिहिली असता आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिळतो. उदा. अजयकडे 10 गोट्या आहेत व विजयकडे, अजयकडे आहेत त्यांच्या निम्म्या गोट्या आहेत. म्हणजेच अपूर्णांकांच्या भाषेत विजयकडे 1/2 एवढया गोट्या आहेत. तर मग या दोघाकडे मिळून होणाऱ्या गोट्या आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कशा लिहितात ते बघूया. - 10 1/2 आणि याचे वाचन आपण कसे करावे बरे? - 10 पूर्णांक 1 छेद 2 किंवा 10 पूर्णांक 1 अंश 2 छेद या पद्धतीने आपण त्याचे वाचन करू शकतो.