ऊर्जासाधने

ऊर्जासाधनांचा वापर

views

3:37
अन्न बनविण्यासाठी विविध ऊर्जासाधनांचा वापर केला जातो. जसे लाकूड, कोळसा, रॉकेल, वीज, नैसर्गिक वायू यांचा वापर आपण करतो. ही सर्व पदार्थांवर आधारित ऊर्जासाधने आहेत. याऐवजी जर आपण सौरऊर्जेचा वापर करून सौर चुलीवरती अन्न शिजवले तर त्यामुळे प्रदूषण होणार नाही आणि उर्जेची बचत होईल.ऊर्जा साधनांचा वापर करून विविध प्रकारची वीज निर्माण करता येते . उदा :- पाण्यापासून जलविद्युत, दगडी कोळशापासून औष्णिक विद्युत , अणूपासून अणुविद्युत तर जमिनीच्या आतील उष्णतेचा वापर करून भूगर्भीय विद्युत. यात औष्णिक विद्युत निर्माण करताना प्रत्यक्ष ऊर्जा साधनांचा थेट वापर करावा लागतो. यामध्ये दगडी कोळशाचे ज्वलन करून त्यापासून निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या आधारे विद्युत निर्मिती करता येते. अशाच तऱ्हेने गतीज ऊर्जेच्या आधारे देखील विद्युत निर्मिती करता येते .लाकूड :- खेडेगावात तुम्ही गेलात किंवा गावातच राहत असाल तर स्वयंपाक चुलीवरती करता येतो हे पाहिले असेल. त्यासाठी इंधन म्हणून लाकडाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. प्राचीन काळी लाकूड हाच मानवाचा एकमेव ऊर्जास्त्रोत होता. अगदी सतराव्या शतकापर्यंत लाकूडच वापरले जायचे. जंगलातून लाकूड मिळते. हे लाकूड उष्णता निर्मितीसाठी बऱ्यचा ठिकाणी वापरले जाते. खेड्यांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड सर्रास वापरला जातो. तसेच कारखान्यांमधील बॉयलर्समध्ये इंधन म्हणून पूर्वी लाकूडच वापरत. आजही लाकूड भारताचे पहिले इंधन आहे. लाकडापासून कोळसा तयार करतात. हा कोळसा स्वयंपाकासाठी वापरला जातो. कोळसा :- प्राचीन काळी भूहालचालींमुळे म्हणजेच भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी यासारख्या कारणामुळे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष जमिनीमध्ये गाडले गेले. त्यावर दाब पडून आणि जमिनीमधील अंतर्गत उष्णतेचा परिणाम होऊन त्यातील विविध घटकांचे विघटन होऊन त्यामध्ये फक्त कार्बनद्रव्ये शिल्लक राहिली. त्यापासून कोळशाची निर्मिती झाली.