स्थितीक विद्युत

तडितरक्षक

views

2:07
ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात. त्याला तडितरक्षक असे म्हणतात.तडीतरक्षक तांब्याच्या एका लांब पट्टीने बनवलेला असतो. इमारतीच्या सर्वात उंच भागावर त्याचे एक टोक बसवलेले असते. या टोकाला भाल्यासारखी अग्रे असतात. पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडलेले असते. त्यासाठी जमिनीच्या आत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा करतात. त्यात पाणी टाकण्याची सोय करतात. त्यामुळे वीज चटकन जमिनीमध्ये जाते आणि नुकसान होण्यापासून बचाव होतो. विद्युतप्रभारित ढग इमारतीवरून जाताना इमारतीकडे प्रवाहित होणारे विद्युतप्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीत पोहोचवले जातात. त्यामुळे इमारतीचे नुकसान टळते. उंच इमारतीवर असा तडितरक्षक बसवल्याने आजूबाजूच्या परिसराचे वीज पडण्यापासून संरक्षण होते. टोकदार वस्तूकडे विद्यूतप्रभार चटकन आकर्षित होतो. म्हणून या अग्रांकडे विद्युत प्रभारित ढगातील प्रभार आकर्षित होतो. तडितरक्षकाचे क्षेत्रफळ पुढे जास्त असल्याने विद्युतप्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीत त्वरित पोहचवला जातो व नुकसान टळते.खड्यात कोळसा व मीठ का टाकतात?कारण कोळसा व मीठ विजेचे सुवाहक आहेत. म्हणून त्यामुळे तडितरक्षकावर पडणारी वीज चटकन जमिनीत पसरण्यासाठी त्यांची मदत होते.