पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार

पूर्णाक संख्यांचा भागाकार

views

3:13
पूर्णाक संख्यांचा भागाकार: आताच आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते पाहिले. आता आपण पूर्णांक संख्यांचा भागाकार कसा करतात ते समजून घेऊ. मुलांनो, जर एका धन पूर्णांकाला दुसऱ्या धन पूर्णांकाने भागले असता नि:शेष भाग जात असेल; तर भागाकार धन पूर्णांक असतो. आणि जर नि:शेष भाग जात नसेल, तर भागाकार धन अपूर्णांक असतो. हे आपल्याला माहीत आहे. उदा. 24 ÷ 6 म्हणजेच 24/(6 ) = 4, यातील भागाकार धन पूर्णांक आहे. उदा. 13 ÷ 4 म्हणजेच 13/4 = 3 + 1/4 यातील भागाकार धन अपूर्णांक आहे. मुलांनो, संख्या रेषेवरील शून्य (0) या संख्येस आरंभबिंदू म्हणतात. या शून्याच्या उजवीकडे धन पूर्णांक संख्या असतात. उजव्या बाजूला जसजशा या संख्या पुढे जातील तसतशी त्यांची किंमत वाढत जाते. आणि डावीकडे ऋण पूर्णांक संख्या असतात. डाव्या बाजूला जसजशा या संख्या पुढे जातील तसतशी त्यांची किंमत कमी होत जाते. हे आपल्याला माहीत आहेच. तर अशा या संख्या रेषेवर आपण ऋण पूर्णांक संख्या दाखवू शकतो. त्याचप्रमाणे त्यांचे भागही दाखवू शकतो.