कोन व कोणाच्या जोड्या

कोटिकोन

views

3:49
कोटिकोन (Complementary angles) : मुलांनो आता आपण कोटिकोन म्हणजे काय याचा अभ्यास करूया. कोटिकोन : ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 असते ते कोन परस्परांचे कोटिकोन असतात. आपण दिलेल्या माहितीवरून कोटिकोनांचे माप कसे शोधायचे ते पाहू या ; उदा. 70 मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप किती असेल ते शोधून काढा. या उदाहरणामध्ये 70 मापाचा कोन आपल्याला माहीत आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप काढण्यासाठी कोटिकोनाचे माप आपण X मानू. कारण ते माप आपल्याला माहीत नाही. मग आपले समीकरण असे होईल: 70 + X = 90 (आता दोन्ही बाजूंमधून 70 वजा करू) = 70 + X - 70 = 90 -70 ( घन 70 व ऋण 70 कमी झाले आणि 90 मधून 20 वजा केले) = x = 20 म्हणून 70 मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप 20 आहे. आता आणखी एक उदाहरण सोडवू.