द्रव्याचे मोजमाप

मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा

views

3:59
मुलांनो, आता आपण मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञांची ओळख करून घेऊ या. मूलद्रव्यांच्या नावातील पहिले अक्षर किंवा काही वेळा पहिले व दुसरे अक्षर अशा संक्षेपास मूलद्रव्याची संज्ञा असे म्हणतात. डाल्टनने मूलद्रव्यांना संज्ञा देण्यासाठी विशिष्ट चिन्हांचा वापर केला होता. उदा. हायड्रोजनसाठी ʘ या तर तांबे या मूलद्रव्यासाठी © असा चिन्हांचा वापर केला होता. मात्र आज आपण ज्या प्रचलित संज्ञा वापरतो त्या संज्ञांसाठी त्या मूलद्रव्याच्या नावातील पाहिले अक्षर किंवा दुसरे अक्षर किंवा त्या मुलद्रव्याच्या नावातील इतर अक्षरांचा वापर केला जातो. उदा. हायड्रोजन (Hydrogen) – H, कॅल्शिअम (Calcium)- Ca किंवा मॅग्नेशिअम (Magnesium) – Mg इत्यादी. दोन अक्षरांपैकी पहिले अक्षर इंग्रजी मोठ्या लिपीत व दुसरे अक्षर लहान लिपीत लिहितात. सध्या जगभर IUPAC (International Union Of Pure and Applied Chemistry) ने ठरविलेल्या संज्ञा वापरल्या जातात. आणि ही नावे व संज्ञा जगभर अधिकृत म्हणून जगभर समजल्या जातात. सध्याची रासायनिक संज्ञा पद्धती ही ब्राझीलिअसने शोधलेल्या पद्धतीवर आधारित आहे.