बैजिक राशी

बैजिक राशींचा गुणाकार

views

4:05
बैजिक राशींचा गुणाकार (Multiplication of algebraic expressions) – मुलांनो, आता आपण बैजिक राशींचा गुणाकार कशा प्रकारे करतात ते पाहणार आहोत. एकपदीने एकपदीला गुणणे: उदाहरण 1 : 3x X 12y = 3 X 12 X x X y = 36xy या उदाहरणामध्ये प्रथम सह्गुणकांचा गुणाकार केला आणि मग चलांचा गुणाकार केला.उदाहरण 2: (-12x ) X 3y2 = -12 X 3 X x X y X y = -36xy2 दोन एकपदींचा गुणाकार करताना सर्वप्रथम सहगुणकांचे चिन्हे लक्षात घेऊन गुणाकार केला. नंतर चलांचा गुणाकार केला. या उदाहरणामध्ये -12 व 3 चा गुणाकार -36 येतो व y चा वर्ग असल्यामुळे y X y दोन वेळा लिहिले. म्हणून उत्तर -36xy2.आले.