संविधानाची वैशिष्ट्ये

निवडणूक आयोग

views

02:25
निवडणूक आयोग वेळोवेळी आपले निर्णय जाहीर करत असते ते आपण नेहमी पाहतो आणि वाचतो. भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे. ती यशस्वीपूर्ण रीतीने चालवायची असेल तर ठरल्याप्रमाणे निवडणुका घेणे व लोकप्रतिनिधी निवडणे आवश्यक असते. या निवडणुका खुल्या आणि निर्भीड वातावरणात व्हाव्यात, तसेच यात कोणत्याही दबावाशिवाय मतदान करता यावे म्हणून भारतीय संविधानाने ही जबाबदारी एक स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली आहे. ही जबाबदारी जर शासनावर सोपवली तर खुले आणि न्याय्य वातावरण मिळू शकेल याची खात्री देता येत नाही. म्हणूनच निवडणुकांसाठी या खास यंत्रणेची किंवा आयोगाची निर्मिती केली आहे. त्यालाच ‘निवडणूक आयोग’ असे म्हणतात. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारताच्या सर्व महत्त्वाच्या निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. तसेच निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले सर्व नियम हे नागरिकांना व प्रतिनिधींना पाळावेच लागतात. नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होवू शकतो. निवडणूक आयोगाला जी कर्तव्ये पार पाडावी लागतात ती अशी : मतदारसंघ आखणे, मतदारयादी तयार करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, निवडणूक चिन्हे ठरवणे, उमेदवार अर्ज तपासणे, निवडणुका पार पाडणे, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे इत्यादी. मुलांनो तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की, सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत डॉ. नासीम झैदी. त्यांनाच ELECTION COMMISIONER असे म्हणतात. २०१५ पासून ते कार्यरत आहेत. ते भारताचे २० वे निवडणूक आयुक्त आहे.