स्वराज्याचे तोरण बांधले.

शिवरायांचे चातुर्य

views

2:13
आदिलशाहाला शिवरायांच्या कार्याची माहिती मिळताच तो आश्चर्यचकित झाला. त्याला वाटले शिवाजीचा पिता शहाजीराजे माझ्या इथे चाकरीला असताना त्याचा मुलगा अशा करामती कशा करू शकतो? त्याने शहाजीराजांना याबद्दल जाब विचारला. शहाजीराजांना हे माहित होते. पण आदिलशाहाला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. पण त्यांनी त्यावेळी आदिलशाहास कळवले की ‘जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही, म्हणून शिवाजी राजांनी किल्ला घेतला असावा.’ असे सांगून त्यांनी ती वेळ निभावून नेली. शिवरायांनीही आदिलशाहाकडे जासूद पाठवला. त्या जासूदाने आदिलशाहास सांगितले. ‘जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशाहाच्या हितासाठीच किल्ला घेतला. यात दुसरा काहीही हेतू नाही.’ असे चलाखपणाचे उत्तर त्यांनी पाठवले. शहाजीराजे व शिवराय यांनी आदिलशाहाला गाफील ठेवण्यासाठी व त्याने त्यांच्या ताब्यात असलेल्या जहागिरीकडे जास्त लक्ष देऊ नये म्हणून आदिलशाहास खोटे सांगून गप्प बसवले. स्वराज्याची खबरही त्याच्या कानी लागू दिली नाही. यातून या पिता – पुत्राची हुशारी लक्षात येते. कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते. ते स्वराज्यात असणे शिवरायांना आवश्यक वाटू लागले. शिवरायांनी नंतर ते दोन्ही किल्ले युक्तीने काबीज केले. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील रोहिडा हा किल्लाही ताब्यात घेतला. अशा तऱ्हेने महाराजांनी एकामागून एक किल्ले जिंकून स्वराज्याची घोडदौड सुरू केली.