ओळख भारताची

भारतातील पिकांची माहिती

views

4:21
भारतातील प्रदेशांनुसार पिकांच्या उत्पादनातही आपल्याला फरक आढळतो. बाजारात किंवा दुकानात मिळणारा चहा, कॉफी, संत्री, आंबे या वस्तू नेमक्या कोठे उत्पादित होतात, त्या आपल्यापर्यंत कशा पोहोचतात, याची माहिती आपण या नकाशाच्या मदतीने घेऊ. या नकाशाच्या आधारे मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दया. आपल्या राज्यात ‘केशर’ कोठून आणावे लागेल? आपल्या राज्यात केशर ‘जम्मू आणि काश्मीर’ या राज्यातून आणावे लागेल. कारण केशर उत्पादन फक्त जम्मू, काश्मीरमध्येच होते. बरं सांगा चहाचे उत्पादन कोण-कोणत्या राज्यात होते? आसाम” व सिक्किम. सफरचंदाचे उत्पादन कोण-कोणत्या राज्यात होते ? सफरचंदाचे उत्पादन जम्मू आणि काश्मीर व हिमाचल प्रदेशात होते. लवंगाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ? केरळ व तामिळनाडू लवंगासाठी केरळ व तामिळनाडू ही राज्ये प्रसिद्ध आहेत. संत्र्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या राज्याचे व जिल्ह्याचे नाव सांगा ? महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा. ‘कॉफीचे’ उत्पादन होणाऱ्या राज्याचे नाव सांगा बरं ? केरळ व कर्नाटक. आंब्याचे उत्पादन घेणारे राज्य आणि जिल्हे कोणते आहेत ? महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन जास्त घेतले जाते. आपल्या देशामध्ये वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्यात विविधता आहे. वनप्रदेशात गेल्यावर ती आपल्याला सहज पाहता येते. ही विविधता आपण जपली पाहिजे. ही विविधता जपणे हे आपले सामाजिक कर्तव्य व जबाबदारी आहे.