शिवरायांची युद्धनीती

डोंगरी किल्ले

views

3:58
डोंगरी किल्ले :- शिवरायांची पूर्ण भिस्त म्हणजे विश्वास हा डोंगरी किल्ल्यांवर होता. एखादा किल्ला ताब्यात आला म्हणजे त्या किल्ल्याच्या आसपासच्या प्रदेशावर सत्ता निर्माण करणे व त्या प्रदेशावर लक्ष देणे सोपे जात असे. ताब्यात आलेल्या किल्ल्यावर भरपूर अन्नधान्य व दारूगोळा यांचा भरपूर साठा करून ठेवला म्हणजे झाले! याचा उपयोग महाराज शत्रूने वेढा दिला की करत. मग शिवरायांचे अगदी थोडे सैन्यही शत्रूच्या प्रचंड फौजेला दोन दोन वर्षे दाद देत नसे. नाशिकजवळील रामशेज हा किल्ला अशाच प्रकारे लढविला गेला होता. तर ती प्रथम राजगडावर ठेवली आणि नंतरही राजधानीसाठी रायगड या डोंगरी किल्ल्याची निवड करण्यामागील हेतू हाच होता. किल्ल्यांचे रक्षण :- फक्त किल्ले ताब्यात घेऊन महाराज शांत बसत नसत, तर त्या किल्ल्यांचे रक्षणही ते मोठ्या चातुर्याने करत. चौथाई :- स्वराज्याचा कारभार चालविण्यासाठी शिवरायांना पैसा उभारणे आवश्यक होते. हा पैसा शिवराय शत्रूच्या प्रदेशावर स्वाऱ्या करून उभारत असत. शत्रूच्या मुलखातून वसुलीचा जो चौथा हिस्सा किंवा वाटा शिवराय घेत, त्यास चौथाई असे म्हणत. आरमारदल उभारले :- महाराजांच्या स्वराज्याला जसा जमिनीवरील शत्रूंपासून धोका होता, तसाच तो सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंपासूनही होता. सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या समुद्री मार्गाने भारतात येऊन पोहचलेल्या परकीय लोकांचा स्वराज्याला पुढे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, हे शिवरायांनी ओळखले होते.