साठवण पाण्याची

प्रस्तावना, प्रयोग-१.

views

04:38
उन्हाळ्यात पाण्यासाठी लोकांना किती त्रास सहन करावा लागतो! काही गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तर काही गावांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या उभारल्या जातात. वर्तमानपत्रातही या बातम्या येत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी शासनाला उपाययोजना कराव्या लागतात. वर्षातील चार महिने पाऊस पडूनसुद्धा का बरे पाणी शिल्लक राहत नसेल? कारण पावसाचे बरेचसे पाणी नद्यांमार्फत समुद्रास जाऊन मिळते. हे गोडे पाणी समुद्रात गेल्यानंतर खारे होते. ते परत मानवाला उपयोगी पडत नाही. पावसाच्या पाण्याचा अगदी थोडासा भाग जमिनीत मुरतो. तेच पाणी आपण नंतर विहिरी, विंधन विहीर यांच्यामार्फत उपसून वापरतो. पाण्याची ही टंचाई मिटविण्यासाठी आपण पावसाचे पाणी साठविले पाहिजे किंवा ते जमिनीत मुरविले पाहिजे. म्हणजे ते पुढील काळात आपणांस उपयोगी पडेल. आता हे पाणी साठवायचे कसे याचीच माहिती आपण या पाठात घेणार आहोत. पाणी जमिनीत कोठे साठते व कोठून वाहून जाते.