महाराष्ट्र राज्याची निर्मिती Go Back प्रस्तावना views 3:59 आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून मराठी भाषिकांचा स्वतंत्र प्रदेश असावा असा विचार पुढे येत होता. १९११ मध्ये इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर न.चि.केळकर यांनी लिहिले की, मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी. तर लोकमान्य टिळकांनी १९१५ साली भाषावर प्रांतरचनेची मागणी केली होती. परंतु हे प्रश्न मार्गी लागू शकले नाहीत, कारण त्यावेळी आपला देश पारतंत्र्यात होता. त्या काळात भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याने हा प्रश्न मागे पडला. १२ मे १९४६ मध्ये बेळगाव येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र संदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. प्रस्तावना राज्य पुनर्रचना आयोग संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना पुढील भाग