धातू – अधातू

क्षरण

views

4:19
क्षरण: क्षरण म्हणजे झिजणे. ज्याठिकाणी ओलावा असतो त्याठिकाणी असणाऱ्या धातूंच्या वस्तूची झीज झालेली तुम्हांला दिसून येते. धातूवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होते व धातूंची संयुगे तयार होतात. या संयुगामुळे धातूवर परिणाम होतो व धातू झिजतात. यालाच क्षरण असे म्हणतात. उदा: लोखंडावर येणारा गंज, स्टेनलेस स्टील इत्यादी. आता मी तुम्हांला आणखी एक महत्त्वाची माहिती सांगते. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे. या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचा पृष्ठभाग तांब्यापासून बनवलेला होता. पण आता तो हिरव्या रंगाचा दिसतो. कारण हवेतील कार्बन डायऑक्साइड व आर्द्रता यांची अभिक्रिया तांब्यासोबत घडून येऊन हिरव्या रंगाचे (कॉपर कार्बोनेट) तयार झाले. हे क्षरणाचे एक उत्तम उदाहरण आहे. अशाप्रकारे धातूचे क्षरण होते. तुम्ही लोखंड पाहिले असेल कधी कधी त्या लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार झालेला दिसतो. तांब्यावर कार्बन डायऑक्साइड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो. त्याचप्रमाणे चांदी या राजधातूवर हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया झाल्यानंतर काळ्या रंगाचा लेप तयार होतो. अशा प्रकारे धातूंचे क्षरण होताना आपण पाहतो. मात्र यामुळे धातू खराब होतो. त्यासाठी धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तेल, ग्रीस, वारनिश व रंग लावला जातो. किंवा जे धातू गंजत नाहीत त्यांचा मुलामा लावला जातो. उदा. लोखंडावर जस्ताचा मुलामा दिला तर लोखंडाचे क्षरण म्हणजेच झीज थांबवता येते.