आपत्ती व्यवस्थापन

भूकंपाच्या वेळी हे करू नका

views

2:51
आता आपण भूकंपात काय करू नये त्याची माहिती घेऊया. 1) भूकंपाच्यावेळी इमारतींच्या लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर केला पाहीजे. 2) एकाच जागी अवघडल्यासारखे न बसता शरीराची हालचाल केली पाहिजे. 3) भूकंपानंतर विजेचे शॉर्टसर्किट होऊ शकते. त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते. म्हणून घरातील विजेच्या मीटरचे मेन स्वीच बंद करावे. तसेच तेलाचा दिवा, मेणबत्ती, कंदील, काडीपेटी यांचा वापर करू नये. बॅटरी म्हणजेच टॉर्चचा वापर करावा. अशा प्रकारे भूकंपामध्ये आपण काळजी घेतली तर संभाव्य धोका टाळू शकतो. भूकंपामध्ये घरे, इमारती यांचे नुकसान तर होते. मात्र जीवितहानी होण्याची शक्यताही खूप असते. त्यासाठी भूकंपरोधक इमारती बांधल्या जातात. त्यामूळे ठरावीक हालचाल जरी भूगर्भात झाली तरी इमारतीला धोका पोहचत नाही. म्हणजेच, जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी इमारत कोसळत नाही. अशा बांधकामाना ‘भूकंपरोधक बांधकामे’ असे म्हणतात. भूकंपापासून होणारे धोके टाळण्यासाठी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड तयार केले आहेत. आय एस 456 या कोडमध्ये काही नियम नमूद केले आहेत. त्यानुसार बांधकाम केले जाते. तसेच भूकंपरोधक बांधकामासाठी ‘आय एस 1893 म्हणजेच (भूकंपरोधक आरेखनांच्या संरचनांचे मानदंड) आणि आय एस 13920 म्हणजेच (भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त क्राँकीट संरचनाच्या ताणीय विस्तार) अशाप्रकारे या कोडमध्ये काही मानदंड, नियम ठरवले आहेत. या नियमांनुसार बांधकाम करणे बंधनकारक केले आहे. तसेच बांधकाम भूकंपरोधक करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते. भूकंपाची हानी टाळण्यासाठी काही यंत्रणा आहेत. भूकंपाची पूर्वसूचना आपल्याला त्या यंत्राद्वारे मिळते. त्याकरिता लेसर रेझिंग, व्हेरी लाँग, बेसलाईन, गायगर कौंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर,टाइड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज यांसारखी आधुनिक साधने वापरली जातात.