एकचल समीकरणे

एकचल समीकरणांची उकल

views

4:12
कधी कधी समीकरण सोडविण्यासाठी त्यावर एकापेक्षा जास्त क्रिया कराव्या लागतात. अशा समीकरणात दोन्ही बाजूंवर क्रिया करून उकल काढण्याचे काही प्रकार आता आपण पाहूया. उदा. 1) 2(x – 3) = 3/5(x + 4) 2 × 5 (x – 3) =3/5×5 (x + 4) ∴10(x – 3) = 3(x + 4) ∴10 x – 30 = 3 x + 12 ∴10 x – 30 + 30 = 3 x + 12 + 30 ∴10 x = 3 x + 42 ∴10 x - 3 x = 3 x + 42 - 3 x ∴ 7 x = 42∴ x = 42/7= 6 ∴ x = 6. मुलांनो, या समीकारणात भागाकार क्रिया आहे. म्हणून दोन्ही बाजूंना 5 ने गुणले. 2 गुणिले 5 =10 व 3/5× 5 ने भाग दिला तर उत्तर 1 आले. आता दोन्ही बाजुंतील कंसाच्या बाहेरच्या संख्येने कंसाला गुणू 10 ने (x – 3) लाव 3 ने (x + 4) ला गुणले. जे वजाबाकीचे समीकरण मिळाले त्याच्या दोन्ही बाजूंमध्ये +30 मिळवले. नंतर समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून 3 x वजा केले. 42 ला 7 ने भागले असता x ची किंमत 6 मिळते.