संख्यांच्या जगात

प्रस्तावना संख्यांच्या जगात

views

6:09
चला १ ते १०० संख्यांचा तक्ता पूर्ण करूया. तुम्हाला १ ते १०० पर्यंतच्या संख्या येतात. मग आता, हा तक्ता पहा. त्यात काही संख्या गाळल्या आहेत, त्या आपल्याला भरायच्या आहेत. शि: शाब्बास! तुम्हांला तर १ ते १०० मधल्या सर्व संख्या अगदी सहज ओळखता आल्या. बरं हे चित्र पहा. यामध्ये काही फुलपाखरांची चित्रे दिली आहेत. आणि त्यावर काही संख्या लिहिल्या आहेत. तर आता आपण या संख्यांचे वाचन करू. मग कोण करेल सुरवात? वि: बाई मी. शि: बरं सांग, पहिल्या फुलपाखरात कोणकोणत्या संख्या आहेत? वि: एक, सव्वीस, पंचाहत्तर आणि एकोणसत्तर शि: अरे वा! बरोबर सांगितलंस! आता या दुसऱ्या फुलपाखरात कोणकोणत्या संख्या आहेत? सांगा पाहू. वि: ब्याऐंशी, छत्तीस, सत्त्याहत्तर, आणि एकावन्न शि: बरोबर! आता तिसऱ्या फुलपाखरातील संख्या सांगा. वि:एकोणीस, चौसष्ट, छप्पन्न, त्र्याऐंशी. शि: छान! आता शेवटच्या फुलपाखरातील संख्या सांगा. वि: नव्व्याण्णव, त्रेचाळीस, तीस आणि बारा. शि: अगदी बरोबर ओळखलंत सर्वांनी.