मानवी शरीर व इंद्रिय संस्था

श्वसनप्रक्रीया

views

3:51
मानवी शरीरामध्ये विविध जीवनप्रक्रीया चालू राहण्यासाठी उर्जेची खूप आवश्यकता असते. ऊर्जेची निर्मिती ही पेशींमध्ये होत असते. या ऊर्जानिर्मितीसाठी पेशींना विद्राव्य अन्नघटक व ऑक्सिजनचा पुरवठा होणे खूप गरजेचे असते. ही कामे श्वसनसंस्था व रक्ताभिसरण संस्था करतात. श्वसनाची प्रक्रिया ही बहि:श्वसन/बाह्यश्वसन, अंत:श्वसन आणि पेशीश्वसन या तीन टप्प्यांत होत असते. त्यांची आता आपण माहिती घेऊ. बहि:श्वसन/बाह्यश्वसन: नाकावाटे आपण श्वास घेतो. नाकाच्या दोन छिद्रांना नासिका छिद्रे म्हणतात. त्यामागील पडद्याला नासीका पटल असे म्हणतात. नाक हे घाणेंद्रिय आहे. नाकाद्वारे आपण श्वास घेतो व उच्छवास सोडतो. अंत:श्वसन: शरीरातील सर्वच पेशी व रक्त यांच्या दरम्यान वायूंची देवाणघेवाण होत असते. या वायूंच्या देवाणघेवाणीलाच आपण अंत:श्वसन असे म्हणतो. अंत:श्वसन या क्रियेद्वारे रक्तातून पेशींमध्ये ऑक्सीजन (O2) वायू जातो. तर पेशींतून रक्तामध्ये कार्बन डाय ऑक्साइड (CO2) येतो.